लग्न झाल्यानंतर सर्वच महिला गळ्यात मंगळसूत्र परिधान करतात. बाजारात सोनं, चांदी, डायमंड, मोती इत्यादी अनेक वेगवेगळ्या डिझाइन्सचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑफिसला किंवा इतर वेळी बाहेर जाताना महिला प्रामुख्याने मोत्याचे पेंडेंट असलेले मंगळसूत्र घालण्यासाठी जास्त पसंती दर्शवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोत्याचे पेंडेंट असलेले काही मंगळसूत्र डिझाईन्स तुम्हाला सांगणार आहोत. या पद्धतीचे मोती पेंडेंट असलेले मंगळसूत्र तुम्ही रोजच्या वापरात किंवा ऑफिसला जाताना घालू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
रोजच्या वापरात परिधान करा मोत्याचे पेंडंट असलेले सुंदर नाजूक साजूक मंगळसूत्र

तुम्हाला जर हेवी लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचे मंगळसूत्र परिधान करू शकता. हे मंगळसूत्र गळ्यात हेवी लुक देतात.

साडी नेसल्यानंतर गळ्याभोवती असलेले मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे मंगळसूत्र ट्राय करू शकता.

नाजूक साजूक पेंडेंट असलेले मंगळसूत्र गळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीचे मोती पेंडेंट मंगळसूत्र रोजच्या वापरात घालू शकता.

कॉटनची साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर तुम्ही या पद्धतीचे मोती पेंडेंट असलेले मंगळसूत्र घालू शकता. यामुळे तुमचा लूक स्टयलिश दिसेल.

काही महिलांना साडी नेसल्यानंतर मोठे मंगळसूत्र परिधान करायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही दोन चैनीचे गुंफण असलेले मोती पेंडेंट परिधान करू शकता.






