तुमचाही पुनर्जन्म झालाय, या संकल्पनेवर काय म्हणतात विविध धर्म? जाणून घ्या
हिंदू धर्म असे सांगते की जन्म आणि मृत्यू हे एक चक्र आहे. भागवत गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की आपला आत्मा आपला देह आहे आणि या वरचे शरीर जणू कपडे! म्हणजेच आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतच असते फक्त शरीर नवीन असते.
बौद्ध धर्मामध्ये ही अशा काही गोष्टी लिखित आहेत. तथागत गौतम बुद्ध सांगतात की आत्मा जरी नसला तरी चेतना आहेत. या चेतना नवनवीन रूपाने जन्म घेत असतात. आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे परिणाम पुढच्या जन्मावर होते.
जैन धर्म मानतो की आत्मा अमर आहे आणि कर्मांच्या बंधनामुळे त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. सम्यक ज्ञान, दर्शन आणि आचरण यांच्या मदतीने आत्मा कर्मबंधनातून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो.
शीख धर्मात सुद्धा पुनर्जन्म या संकल्पनेला मानले जाते पण त्यावर इतके लक्ष दिले जात नाही जितके इतर धर्मात दिले जाते. शीख धर्मात असे म्हटले जाते की देवाचे नामस्मरण आणि चांगले कर्म केल्यास ईश्वराशी एकरूप होता येते आणि या पुनर्जन्माच्या संकल्पनेतून मुक्ती मिळवता येते.
मुळात पाश्चात्य देशांमध्ये किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये पुनर्जन्म या संकल्पनेला मान्यता नाही. पण काही सुफी या संकल्पनेला मानतात. संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या अजून सिद्ध झाली नाही.