निरोगी आरोग्यसाठी खा 'हे' सुपरफूड्स. (फोटो सौजन्य - Social Media)
आवळा शरीरासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. व्हिटॅमिन C ने भरलेला, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त आवळा खाणे शरीरासाठी फार फायद्याचे असते.
तुळस अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत, तणाव कमी करून आरोग्यास ऊर्जा प्रदान करते. आरोग्यास असलेल्या अनेक फायद्यांसाठी भारतीय संस्कृतीत तुळशीला विशेष मान आहे.
ओट्स फायबर आणि प्रथिनांनी भरलेले असते. महत्वाचे म्हणजे ओट्समध्ये वजन कमी करण्यात मदत करणारे पोषणमूल्य असतात.
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. बऱ्याच फेस पॅकमध्ये हळदीचा वापर केला जातो. सांधेदुखी आणि त्वचेसाठी हळद फार फायद्याची असते.
दररोज बदाम खाण्याचा सल्ला आपण लहानपणापासून ऐकत असू. चांगले फॅट्स आणि व्हिटॅमिन E ने समृद्ध बदाम मेंदूच्या कार्यक्षमता वाढवते.