who is tumbadchi manjula girl priyal naik. ( फोटो सौजन्य - Social Media )
पण तुम्हाला माहित आहे का? ही अभिनेत्री आहे तरी कोण? जर तुम्ही काकण चित्रपट पाहिला असेल तर प्रियलने काकण सिनेमात काम केले होते. ती या सिनेमात बालकलाकार होती.
काकण सिनेमातून प्रसिद्धी मिळवत प्रियल आता 'तुंबाडची मंजुळा' सिनेमात एका मुख्य भूमिकेत झळकली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रियलच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
नुकतेच प्रियलने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने 'तुंबाडची मंजुळा' सिनेमाचे चित्र असणारे Customised T-Shirt परिधान केले आहे.
त्या पोस्टखाली तिने कॅप्शन दिले होते की, "Tumbadchi Manjula is taking over. Housefull everywhere!!" म्हणजेच "'तुंबाडची मंजुळा' चित्रपट अगदी सगळीकडेच हाऊसफुल आहे."
आपल्या सौंदर्याने मन मोहणाऱ्या प्रियलला आणखीन पुढे पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे.