जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर...
जपान दाैऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांचे जंगी स्वागत करणयात आले. गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधान मोदींसोबत अनेक करारांवर स्वाक्षरी केली.
याचवेळी पंतप्रधान मोदींना जपानचे पुजारी रेव्हरंड सेइशी हिरोसे यांच्याकडून त्यांना दारुमा डाॅल भेट देण्यात आली. माहितीनुसार, ही डाॅल एक साधीसुधी डाॅल नसून ती जपानी संस्कृतीत नशीब आणि साैभाग्याचे प्रतीक मानले जाते
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या डाॅलचा संबंध भारताशी जोडलेला आहे कारण दारुना परंपरा फक्त जपानमध्येच नाही तर तामिळनाडूतील कांचीपुरम येथाल भिक्षू बोधिधर्म यांच्या वारशावर आधारित आहे, ज्यांना जपानमध्ये दारुमा दैशी म्हणून ओळखले जाते. ते एक हजार वर्षांपूर्वी जपानमध्ये आले होते असे म्हटले जाते
असे म्हटले जाते की, बोधिधर्म यांनी भिंतीकडे तोंड करुन, आपल्या शरीराला वाकवून सलग ९ वर्षे ध्यानधारणा केली होती, ज्यामुळे दारुमा डाॅलचा आकार वेगळा आणि गोलाकार असल्याचे सांगितले जाते. यात कोणताही अवयव किंवा डोळे नाहीत
दरम्यान जपानमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत