Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जपानला जाण्याची गरज नाही; मुंबईतच घेता येईल गुलाबी फुलांचा आनंद

मुंबईतील विक्रोली-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फेब्रुवारी-मार्चमध्ये पिंक ट्रंपेट झाडांच्या फुलांमुळे संपूर्ण रस्ता गुलाबी रंगात न्हाल्यासारखा दिसतो, हे मुंबईचं लहानसे चेरी ब्लॉसम स्पॉट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 10:24 AM
मुंबईतील विक्रोली-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फेब्रुवारी-मार्चमध्ये पिंक ट्रंपेट झाडांच्या फुलांमुळे संपूर्ण रस्ता गुलाबी रंगात न्हाल्यासारखा दिसतो, हे मुंबईचं लहानसे चेरी ब्लॉसम स्पॉट आहे.

मुंबईतील विक्रोली-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फेब्रुवारी-मार्चमध्ये पिंक ट्रंपेट झाडांच्या फुलांमुळे संपूर्ण रस्ता गुलाबी रंगात न्हाल्यासारखा दिसतो, हे मुंबईचं लहानसे चेरी ब्लॉसम स्पॉट आहे.

Follow Us
Follow Us:
  • जपानचा चेरी ब्लॉसम जगभर प्रसिद्ध आहे.
  • सुंदर गुलाबी फुलांच्या सानिध्यांत मन एकदम तृप्त होत.
  • पण आता हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला जपानला जाण्याची गरज नाही.
जपानचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर सर्वात आधी गुलाबी चेरी ब्लॉसमने सजलेली स्वप्नवत दृश्यं उभी राहतात. दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हीच सुंदर फुलं पाहण्यासाठी लाखो पर्यटक जपानला जातात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की असा गुलाबी अनुभव घ्यायला मुंबईकरांना हजारो किलोमीटरचा प्रवास करायची गरज नाही.

अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

मुंबईतच गुलाबी फुलांचा स्वर्ग

धावपळीच्या मायानगरी मुंबईतही एक असा परिसर आहे, जिथे काही काळासाठी शहराचं गडबडलेलं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील विक्रोली ते घाटकोपर दरम्यानचा भाग सध्या “मुंबईचा चेरी ब्लॉसम स्पॉट” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इथे रस्त्यांच्या दुतर्फा गुलाबी फुलांनी भरलेली झाडं दिसतात आणि संपूर्ण परिसर एखाद्या चित्रासारखा भासतो.

हे चेरी ब्लॉसम नाहीत, पण नजारा तितकाच सुंदर

मुंबईचं उष्ण आणि दमट हवामान पारंपरिक चेरी ब्लॉसमसाठी योग्य मानलं जात नाही. तरीही इथे खास प्रकारची झाडं छान वाढलेली दिसतात. विक्रोळी–घाटकोपर दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दिसणारी ही गुलाबी फुलांची झाडं म्हणजे Tabebuia Heterophylla, ज्यांना पिंक ट्रंपेट ट्री असंही म्हणतात. ही झाडं जरी जपानी चेरी ब्लॉसमपेक्षा वेगळी असली, तरी फुलांच्या बहरात त्यांचा देखावा एखाद्या स्वप्नासारखा वाटतो.

विक्रोळीचा गुलाबी हायवे का आहे खास

दरवर्षी काही आठवड्यांसाठी हा संपूर्ण स्ट्रेच गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. झाडांवर गुलाबी फुलांचे घोस लागतात, फुलं रस्त्यावर झरतात आणि जमिनीवर जणू गुलाबी चादर पसरल्यासारखं दृश्य तयार होतं. याच अनोख्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या अनेक व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे नमूद केलं जातं की ही फुलं पिंक टॅबेबिया आहेत आणि ठिकाण आहे विक्रोळी-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. काही लोकांनी या परिसराच्या सौंदर्याचं कौतुक केलं, तर काहींनी प्रदूषणामुळे नजारा थोडा बिघडतोय अशी खंत व्यक्त केली. अनेक स्थानिक लोक सांगतात की ते वर्षानुवर्षे इथे फिरायला येतात, पण आता ड्रोन शॉट्समुळे ही जागा अजूनच प्रसिद्ध झाली आहे.

विक्रोळी पिंक ब्लॉसम स्पॉटला कसं जायचं

  • या ठिकाणी पोहोचणं खूप सोपं आहे.
  • लोकल ट्रेनने येत असाल तर सेंट्रल लाईनवर विक्रोळी किंवा घाटकोपर स्टेशनला उतरता येईल. तिथून ईस्टर्न
  • एक्सप्रेस हायवेच्या दिशेने चालत किंवा ऑटोने जाता येतं.
  • कार किंवा बाईकने येणाऱ्यांसाठी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून थेट हा परिसर गाठता येतो.
  • हा सार्वजनिक रस्ता असल्यामुळे इथे कोणताही प्रवेश शुल्क किंवा तिकीट लागत नाही.
तिकीट आहे का?

इथे जाण्यासाठी कोणतेही तिकीट नाही. गुलाबी फुलांचा आनंद घेण्यासाठी इथे कोणतंही तिकीट नाही. मात्र हा भाग वाहतुकीसाठी आणि जॉगिंगसाठी वापरला जातो, त्यामुळे भेट देताना जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे.

सोशल मीडिया गर्दी आणि सिविक सेन्स

या जागेचं सौंदर्य जितकं चर्चेत आहे, तितकंच काही लोकांचं वागणं चिंतेचा विषय ठरत आहे. काही जण फुलांच्या फांद्या तोडताना दिसतात, काही फक्त रील्स बनवण्यात गुंतलेले असतात आणि त्यामुळे फुटपाथ अडवले जातात. यामुळे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करणाऱ्यांना त्रास होतो. झाडांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येकानं थोडं भान ठेवणं गरजेचं आहे.

मुंबईतील इतर गुलाबी फुलांचे स्पॉट

विक्रोलीशिवाय मुंबईत आणखीही काही ठिकाणी पिंक ट्रंपेट ट्री पाहायला मिळतात. त्यामध्ये:

  • छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर
  • बोरीवली गोराई रोड
  • फोर्टमधील लायन गेटसमोरचा भाग
  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंजजवळ
  • राणी बाग
  • माहिम नेचर पार्क
याशिवाय शहरात Tabebuia Berteroi आणि Tabebuia Aurea या जातींची झाडंही आहेत, ज्यांवर पिवळ्या रंगाची फुलं येतात.

जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण…

गुलाबी नजारा पाहण्यासाठी योग्य वेळ

या झाडांना साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत फुलं येतात. सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रकाश सौम्य असताना हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. थोडक्यात सांगायचं तर, जपानच्या चेरी ब्लॉसमची आठवण करून देणारा गुलाबी अनुभव मुंबईतच घ्यायचा असेल, तर विक्रोली-घाटकोपरचा हा हायवे नक्कीच भेट देण्यासारखा आहे, फक्त निसर्गाचा आदर राखायला विसरू नका.

Web Title: Japan like cherry blossom place in mumbai travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 07:32 AM

Topics:  

  • Japan
  • Mumbai
  • travel news

संबंधित बातम्या

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
1

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त
3

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
4

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.