महिलांनी नियमित प्यायला हवेत 'हे' प्रभावी ज्यूस
काकडीचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही पालक काकडीच्या रसाचे सेवन करू शकता. यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होईल.
नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे नियमित एक नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाणी प्याल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
बीट गाजरचा ज्यूसचा प्याल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात निर्माण झाली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी गाजर बीटच्या रसाचे सेवन करावे.
कोहळं खाल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये विटामिन सी,बी१, बी३, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोहळ्याचा ज्यूस पिऊ शकता.
बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये अनेक हंगामी फळे उपलब्ध असतात. या फळांचा ताजा रस प्याल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.