हिवाळ्यात गाजराचा ज्यूस पिल्याने काय होते? वृद्धत्व थांबवते अन् याचे फायदे वाचाल तर रोज आहारात समाविष्ट कराल
गाजराच्या ज्यूसचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यातील पोषक घटक उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका टाळण्यास मदत करतात.
गाजराचा रस हा कॅरोटीनॉइड्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामध्ये बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन यांचा समावेश आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
गाजराचा रस वृद्धत्व कमी करते. दररोज केले जाणारे याचे सेवन शरीरातील विषारी घटक किंवा टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करतात. गाजराच्या रसात कॅरोटीनॉइड्स असतात जे यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.
गाजरांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियमसह आवश्यक खनिजे असतात, जे पेशींचे विघटन रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
गाजराचा रस तयार करण्यासाठी गाजराला धूवून, साल काढून याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला. आता यात लिंबाचा रस, आल्याचा एक तुकडा आणि हलके मीठ आणि पाणी घालून ब्लेंड करा. तुमचा गाजराचा ज्यूस तयार आहे.