सध्या सर्वांचीच लाईफस्टाईल बदलली आहे आणि त्यामुळे अगदी कमी वयातदेखील हार्ट अटॅक येत आहेत. आपले हृदय चांगले ठेवण्यासाठी काही सोप्या 5 सवयी तुम्ही लाऊन घ्याव्यात
हृदयाच्या आरोग्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खा. मीठ आणि साखरेचे सेवन कमी करा
नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. आठवड्यातून किमान 30 मिनिटे मध्यम अथवा जलद असा व्यायाम ट्रेनरच्या सल्ल्याने करावा
धुम्रपान हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. धुम्रपान सोडल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्हाला हृदयाचा रोग नको असेल तर धुम्रपान टाळा
तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. योग, ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छ्वास यासारख्या तणाव व्यवस्थापन तंत्रांचा सराव करा
नियमित आरोग्य तपासणीमुळे हृदयविकाराची लक्षणे लवकर ओळखता येतात. तुमच्या डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घ्या