केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कफ सिरपविषयी सल्लागार जारी केला आहे. यात दोन वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) मध्य प्रदेशात कथितरित्या दूषित कफ सिरपमुळे बालमृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात चाचणी केलेल्या कोणत्याही सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) किंवा इथिलीन ग्लायकोल (EG) आढळले नाही. हे घटक मूत्रपिंडाला गंभीर नुकसान करू शकतात, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DGHS ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘पाच वर्षांखालील मुलांसाठी कफ सिरपची शिफारस केली जात नाही. तसेच, वृद्ध लोकांसाठी, त्यांचा वापर काळजीपूर्वक क्लिनिकल मूल्यांकन, बारकाईने देखरेख आणि योग्य डोसचे काटेकोर पालन यावर आधारित असावा, असेही नमुद करण्यात आले आहे.
DGHS च्या डॉ. सुनीता शर्मा म्हणाल्या की, कफ सिरप संदर्भात लोकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचे पालन करण्यास जागृत करणे आवश्य़क आहे. मुलांमध्ये तीव्र खोकला अनेकदा आपोआप बरा होतो आणि बहुतेकदा औषधांशिवायही बरा होतो.
केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कफ सिरपविषयी सल्लागार जारी केला आहे. यात दोन वर्षांखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नयेत, तसेच सर्व आरोग्य केंद्रे आणि निदान युनिट्स योग्यरित्या तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी आणि वितरण सुनिश्चित करावे, असे निर्देश आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, “काळजीचे हे मानक राखण्यासाठी, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टर आणि फार्मासिस्ट संवेदनशील असणे आवश्यक आहे. सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेश आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि क्लिनिकल आस्थापना/आरोग्य केंद्रांनी सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये ही सूचना लागू आणि प्रसारित करणे गरजेचे आहे.”
Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
अलीकडेच मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे बालमृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) यांचा समावेश असलेले संयुक्त पथक स्थळाला भेटी देऊन विविध सिरपचे नमुने गोळा केले.
कोणत्याही नमुन्यात डायथिलीन ग्लायकोल (DEG) किंवा इथिलीन ग्लायकोल (EG) यासारखे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान करणारे घटक आढळून आले नाहीत. मध्य प्रदेश राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने देखील तीन नमुन्यांची तपासणी करून DEG/EG नसल्याची पुष्टी केली. राजस्थानमध्ये दोन मुलांच्या मृत्यूच्या बातम्यांबाबत मंत्रालयाने स्पष्ट केले की प्रश्नातील उत्पादनात प्रोपीलीन ग्लायकोल नाही, जो DEG/EG दूषिततेचा संभाव्य स्रोत आहे.