जगातील सर्वात महागडा चित्रपट, बनवण्यासाठी लागले 12 वर्ष, सात पिढ्या बसून खातील एवढी झाली होती कमाई
या चित्रपटाचे नाव आहे 'अवतार' , जो साल 2009 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे निर्मिती जेम्स कॅमेरॉन यांनी केली होती. या चित्रपटाने प्रदर्शित होतात टायटॅनिक आणि ज्युरासिक पार्क या चित्रपटांचा विक्रम मोडून काढला.
जेम्स यांनी चित्रपटाची घोषणा तर केली मात्र हा चित्रपट बनवणे काही साधी गोष्ट नाही तर त्यांना नंतर उमजले. कारण हा चित्रपट बनवण्यासाठी हायटेक टेक्नोलॉजची आवश्यकता होती. त्यावेळी ही टेक्नोलॉजी इतकी प्रगत नव्हती, ज्यामुळे काहीकाळ त्यांनी या चित्रपटाचे काम थांबवले.

वर्ष 2006 मध्ये कॅमरॉन यांनी पुन्हा या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली आणि मग 2009 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने सर्वत्र धुमाकूळ घातली. हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला.
आता या चित्रपटाच्या बजेटविषयी बोलणे केले तर, अवतार चित्रपटाचे बजेट 237 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1800 करोड रुपये इतके होते. पण या चित्रपटाने तुफान कमाई केली. या चित्रपटाने 20 हजार 368 कोटी रुपयांची जागतिक कमाई करत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले नाव नोंदवले.