सोशल मीडियावर 'या' दागिन्यांची होती मोठी क्रेझ, पहा नीता अंबानी ते ऐश्वर्या राय यांचे महागडे युनिक दागिने
नीता अंबानी यांचे सर्वच फॅशन लुक सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. त्यांनी परिधान केलेली साडी, दागिने ते अगदी बॅगपर्यंत सर्वच गोष्टी चर्चाचा विषय ठरतात. या लुकमध्ये नीता अंबानी यांनी मधुराई कॉटन घरोच साडी परिधान करत त्यावर मॅचिंग स्टड इअररिंग्स आणि नेकलेस घालून लुक केला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सगळ्यांच्या नजरा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याकडे होत्या. तिने केलेला पांढऱ्या साडीमधील लुकने साऱ्यांच्या नजारा वेधून घेतल्या आहेत. त्यावर तिने चोकर सेटसोबत एक लांब लेयर नेकलेस घातला आहे.
२०२५ या वर्षात अभिनेत्रींनसह सर्व सामान्यांपर्यंत सगळ्यांची मिनिमल दागिन्यांना पसंती दर्शवली आहे. या लुकमध्ये तुम्ही कमीतकमी दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त उठावदार दिसू शकता.
२०२५ या वर्षात अभिनेत्रींच्या दागिन्यांना खूप जास्त पसंती होती. त्यातील खास आकर्षण म्हणजे नीता अंबानी यांचे सुंदर, पारंपरिक दागिने. नीता अंबानी कायमच रत्न, पाचू आणि हिरेजडीत दागिने परिधान करतात.
सोशल मीडियावर अभिनेत्री हिना खानच्या लुकची कायमच चर्चा असते. तिचा हा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये हिना खानने काळ्या रंगच्या साडीवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली होती.