आजच्या काळात, स्मार्टफोन हे केवळ बोलण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी नाही तर आपल्या बँकिंगच्या कामांसाठी देखील वापरला जातो. अशा परिस्थितीत, जर स्मार्टफोन हॅक झाले तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. गोपनीयता आणि सुरक्षितता या दोन्हींसाठी धोके वाढू शकतात. हे होऊ नये म्हणून, तुम्ही थोडे सावध राहणे महत्त्वाचे आहे. तुमचा स्मार्टफोन स्वतःच असे अनेक सिग्नल देतो, जे तो हॅक झाला आहे किंवा हॅक होऊ शकतो हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. जर या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमचा स्मार्टफोन स्वत: देतोय Hacking चे संकेत, वेळीच सावध व्हा; अन्यथा वाढू शकतो धोका
जर तुमचा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा खूपच हळू काम करत असेल, अॅप्स वारंवार क्रॅश होत असतील किंवा साधी कामे देखील लोड होण्यास वेळ लागत असेल, तर हे काही मालवेअरच्या उपस्थितीचे लक्षण असू शकते.
जर तुम्ही तुमचा फोन खूप कमी वापरला असेल, पण तरीही बॅटरी लवकर संपत असेल, तर कदाचित कोणीतरी बॅकग्राउंडमध्ये फोन अॅक्सेस करत असेल.
जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असे काही अॅप्स दिसले जे तुम्ही स्वतः इन्स्टॉल केलेले नाहीत, तर ताबडतोब सतर्क व्हा. हे अॅप्स स्पायवेअर किंवा ट्रोजन असू शकतात. ते तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते.
जर तुमचा डेटा अचानक जास्त वापरला जात असेल किंवा वाय-फाय वरून सतत ट्रॅफिक चालू असेल, तर हे शक्य आहे की हॅकर तुमच्या फोनवरून डेटा पाठवत असेल किंवा प्राप्त करत असेल.
वारंवार पॉप-अप जाहिराती किंवा ब्राउझर आपोआप उघडणे हे सूचित करते की तुमचे डिव्हाइस अॅडवेअरने संक्रमित असू शकते.
स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करा. तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ठेवा. अज्ञात नंबरवरून आलेली कोणतीही लिंक किंवा फाइल उघडू नका.