धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. मात्र धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीं मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे. धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, कोळी समाजाने विराट मोर्चा काढला. हजारो आदिवासी आणि कोळी समाजाबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.