नेरुळ सेक्टर-१ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवलेली शिवसृष्टी पुतळा आणि मावळ्यांच्या प्रतिकृती काही महिन्यांपासून उदघाटनासाठी झाकून ठेवण्यात आले आहेत. मुळात हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून, शासनाचे निर्णय न मिळाल्याने पुतळ्याचे अनावरण झालेले नाही. मनसे शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन येत्या १५ दिवसांत अनावरण न झाल्यास विधीवत पद्धतीने मनसेद्वारे कार्यक्रम करून पुतळ्याचे उदघाटन केले जाईल, असा इशारा दिला. मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, सचिव सचिन कदम, विभागाध्यक्ष निखिल गावडे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.