फोटो सौजन्य - Social Media
कर्जत, संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील ग्रामपंचायत तसेच अन्य भागात बेबंदशाही दाखवून कारभार केला जात आहे.अशा कामना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे विरोध करीत असून अशी बेबंदशाही आमचे कार्यकर्ते मोडून काढतील असे टहं मत राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी मांडले.उमरोली जिल्हा परिषद विभाग आणि नेरळ परिसराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय धामोते येथे उभारण्यात आले असून नरेश जोशी,माधवी जोशी यांच्या माध्यमातून उघडण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि उमरोली जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेले नरेश जोशी आणि माधवी जोशी यांनी पक्षाचे कार्यालय उघडले आहे. उमरोली जिल्हा परिषद गटामधील धामोते या ठिकाणी हे कार्यालय उघडण्यात आले असून या कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांचे हस्ते झाले.त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव,जिल्हा मुख्य प्रवक्त्रे भरत भगत,जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे,तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे आदींसह जिल्हा परिषदेचे माजी सभापती,नारायण डामसे,कर्जत माजी उप सभापती जयवंती हिंदोळा,रवींद्र झांजे,सरचिटणीस भूषण पेमारे,जयेश ठक्कर,मंगल ऐनकर,संतोष थोरवे, जयेंद्र कराले आदी उपस्थित होते.सुरुवातील नरेश जोशी यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या रणनीती या कार्यालयातून करणे सोयीस्कर राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यालय कळंब येथे असून नेरळ येथे आपल्या पार्टीचे कार्यालय असायला हवे असे स्पष्ट केले. कार्यालयाचे व्यवस्था करून कमी कालावधीमध्ये हे कार्यालय उभारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी माधवी जोशी आता सामाजिक कार्यकर्त्या आहेत परंतु त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता आहे. तसेच या ग्रामपंचायत मध्ये चाललेला भोगल कारभार आपल्याला थांबवायचा आहे.कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी वर असताना नेरळ व नेरळ परिसरामध्ये पक्षाची ताकद अजून बळकट करण्याच्या उद्देशाने नेरळ परिसरात कार्यालय उभे राहिले आहे. हे कार्यालय आजुबाजुंच्या पग्रामपंचायत मधील अनागोंदी कारभार यावर आमचे कार्यकर्ते सक्षमपणे लक्ष देत आहेत. त्यासाठी पक्षाचे हे कार्यालय कार्यकर्त्यांना मदतगार ठरेल अससी विशेष घारे यांनी व्यक्त केला.रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी या कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील हे कार्यालय नसून हे एक मंदिर आहे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या सुधाकर घारे यांच्यापर्यंत पोहोचून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भरत भगत यांनी बोलताना सांगितले.