AAP Arvind Kejriwal ON INDvsPAK live on Asia cup 2025
INDvsPAK : नवी दिल्ली : आशिया कप 2025 सुरु असून आजची मॅच ही वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र यावरुन जोरदार राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे ही मॅच रद्द करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावरुन वादंग निर्माण झालेला असताना यावर आपचे सर्वसर्वो अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये होत असलेल्या क्रिकेट सामन्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. बीसीसीआय विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहेत. तसेच पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना तो रद्द करण्याची मागणी केली आहे आणि शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर बहिष्काराचे आवाहन जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की पाकिस्तानसोबत सामना खेळणे हा देशाशी विश्वासघात आहे, अशी टीका केजरीवालांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
आप नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (दि.14) त्यांच्या पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या पोस्टचा हवाला देत लिहिले की पाकिस्तानशी सामना खेळणे हा देशाशी विश्वासघात आहे. प्रत्येक भारतीय यावर खूप संतापला आहे. तसेच, सौरभ यांनी त्यांच्या पोस्टवर लिहिले होते की रक्त आणि खेळ एकत्र येऊ शकत नाहीत. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, पंतप्रधान मोदी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांना लक्ष्य केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“तुम्ही ट्रम्पसमोर किती झुकणार?”
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, पंतप्रधानांना पाकिस्तानसोबत सामना आयोजित करण्याची काय गरज आहे? संपूर्ण देश म्हणत आहे की हा सामना होऊ नये. मग हा सामना का आयोजित केला जात आहे? हे ट्रम्पच्या दबावाखालीही होत आहे का? तुम्ही ट्रम्पसमोर किती झुकणार? असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे.
‘आप’कडून तीव्र विरोध
आम आदमी पक्ष आज भारत-पाकिस्तान सामन्याला जोरदार विरोध करत आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले, त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की रक्त आणि पाणी, रक्त आणि व्यवसाय एकत्र चालू शकत नाहीत, परंतु रक्त आणि क्रिकेट एकत्र चालू आहे.