भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; 'या' पदाधिकाऱ्याने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश(संग्रहित फोटो)
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शनिवारी (दि. १३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका गटाची ताकद वाढली आहे.
रहांगडाले यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला व जिल्हाध्यक्ष वाघमारे यांना मोठा धक्का बसला आहे. वाघमारे यांचा उजवा हात म्हणून रहांगडाले परिचित होते. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी तुमसरचे आमदार राजू कारेमोरे तसेच पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. रहांगडाले यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत इन्कमिंग नेत्यांची संख्या वाढली असून, तुमसर परिसरातील राजकारणात चर्चांना नवीन विषय मिळाला आहे.
रहांगडाले यांचा राजकीय आलेख पंचायत समिती क्षेत्राशी जुळून असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत मी राष्ट्रवादीचा मार्ग निवडला आहे. कुणालाही टीका करण्यापेक्षा मी माझ्या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात हे शक्य होईल. येत्या काळात माझ्यावर येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रवेश महत्त्वाचा
नंदू रहांगडाले, माजी सभापती, पंचायत समिती समर्थकांनी हा निर्णय स्वागतार्ह मानला आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने रहांगडाले यांचा पक्षप्रवेश हा जिल्हा परिषदेच्या राजकारणातील निर्णायक व सकारात्मक ठरेल, अशी चर्चा सुरु आहे.
कोणी कोणत्या पक्षात राहावे, हा व्यक्तिगत विषय
राजकीय क्षेत्रात प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळू शकले नाही. त्यामुळे पुढचा मार्ग कदाचित रहांगडाले यांनी स्वीकारला असावा, कोणी कोणत्या पक्षात राहावे, हा व्यक्तिगत विषय आहे, असे चरण वाघमारे यांनी सांगितले.