दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा. सीजेपीच्या नेत्यांना फक्त जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे तुम्ही भित्र्याप्रमाणे तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात. असं तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, तिरंगा फडकावणे हे कधीपासून पाप मानले जात आहे. असे भित्र्यासारखे वागू नका. तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा. असे आव्हानही अभिजीत दिपकेंनी दिले आहे.
काल सौरव, आशुतोष आणि अजिंक्य शिंदे यांना जबरदस्तीने डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वकिलांशी किंवा कुटुंबीयांशीही बोलू दिले गेले नाही. सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातच विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून तिघांचीही ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. केवळ जंतरमंतरवर राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा ठरवून ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
सीजेपीवर गंभीर आरोप केले जात आहेत, असा सवाल विचारला असता, नुसते आरोप काय करता, पुरावे दाखवा, तुमची सत्ता आहे, चौकशी करा, सिद्ध करा, हे सर्व लोक भित्रे आहेत. पोलिसांच्या मागे लपत आहेत. काल सौरव, आशुतोष आणि अजिंक्य यांना जबरदस्तीने डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते, त्यांना त्यांच्या वकिलांशीही बोलू दिले गेले नाही. आज सकाळी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. फक्त जंतरमंतरवर तिंरगा फडकावला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. मोदींच्या राज्यात जंतरमंतरवर तिरंगा फडकावणे हे पाप आहेका, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी हे सर्व करत आहेत. नरेंद्र मोदी सत्तेत राहण्यासाठी ज्ञानेश कुमार निवडणूक प्रक्रियेत फेरफार करत आहेत.याविरोधात आम्ही लढत आहोत. पण याचा अर्थ असा नाही की इंडिया आघाडीला आमचा विरोध आहे. त्यांचे आंदोलन आणि आमचे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे. असंही अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.






