Aditi Tatkare gave information about when to get the August installment of Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana August Installment : मुंबई : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून ही वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलांना प्रत्येकी 1500 रुपये दिले जातात. मात्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणे अजून बाकी आहे. सप्टेंबर महिना सुरु झाली तरी देखील मागील म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा अजूनही सुरु आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्तांना आता उशीर होत आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्य़ामध्ये दिला जात आहे. यावरुन अनेकदा विरोधक टीका करताना देखील दिसून येतात. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक अपात्र महिलांनी देखील योजनेचा लाभ घेतला आहे. या सर्व अर्जांची बारकाईने छाननी केली जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सोशल मीडियावर पोस्ट करत ऑगस्ट महिन्यांच्या पैशांबाबत माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत माहिती दिली. आदिती तटकरे यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यामुळे मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवले जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये पात्र महिलांना धनलाभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुती सरकारकडून 2100 रुपये दरमहा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर आणि अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर देखील हे पैसे वाढवून देण्यात आलेले नाहीत. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेले आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीना २१०० रुपये देण्याबाबत वा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.