
AIMIM Sahar Shaikh controversy giving fake documents Mumbra political news
एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी एक डायलॉग बोलल्याने त्या रातोरात चर्चेत आल्या. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहर शेख यांनी बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असल्याने सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आली आहे.
हे देखील वाचा : BJPचे स्वप्न भंगले, मावळमध्ये APMC समिती झाली बरखास्त; प्रशासकाची नियुक्ती
ठाणे महापालिकेमध्ये एमआयएम पक्षाच्या नगरसेविका असलेल्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्याविरोधात बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेख यांनी निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनाची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
हे देखील वाचा : पोटनिवडणुकीच्या प्रचाराने पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार उतरले मैदानात
उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.