Anil parab indirect criticism at Nitesh Rane Uddhav Thackeray laughs video viral
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळामध्ये विविध विकास कामांच्या चर्चेबरोबर अनेकदा वैयक्तिक टीका केली जात आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विधीमंडळामध्ये यामुळे नेत्यांमध्ये वादंग होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीच्या नेत्यावर टीका केल्यानंतर शेजारी बसलेले उद्धव ठाकरे हे हसताना दिसत आहे.
विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे बोलत होते. यावेळी त्यांच्या शेजारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बसले होते. यावेळी अनिल परब यांच्या वक्तव्याची आणि त्यावर उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनिल परब म्हणाले आहेत की, “माझ्या येथे एका सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र तो जागते रहो म्हणून ओरडत असतो. आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे,” असा अप्रत्यक्ष टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अनिल परब म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये एक नेपाळी फिरतो आहे. त्याला असे वाटते की त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा असा समज झाला आहे. हल्ली काय शाल वैगरे घेऊन फिरत असतात. त्यांचा असा समज झाला आहे. त्यांच्या जीवावर नाही तर हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यामध्ये तेवढी हिंदू धर्म सांभाळण्या एवढी ताकद आहे. परंतू माझ्या धर्माने स्वतःच्या धर्माचे रक्षण करताना इतरांच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला आम्हाला शिकवलं आहे. मागच्या काही दिवसांत ज्या घटना झाल्या आहेत त्यामुळे जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे,” असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.
तसाच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतो आहे ।
हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत ।।#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab pic.twitter.com/KCwoWdpLcZ— Anil Parab (@advanilparab) March 25, 2025
विधान परिषदेमध्ये अनिल परब हे बोलण्यासाठी उभे असताना त्यांनी महायुतीच्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे घणाघात केला. परब यांनी टिप्पणी केल्यानंतर शेजारी बसलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गालामध्ये खुदकन हसले. त्यांना अनिल परब यांचा रोख अगदी काही क्षणांत लक्षात आला. त्यामुळे अनिल परब यांचे वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. राजकीय वर्तुळामध्ये यावरुन चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्रिपदाच्या शर्यतीतून डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पान टपरीचालक, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास राहिला आहे.