
Anjali Damania Criticizes Rupali Chakankar for Avoiding SIT Inquiry in ashok kharat case
Damania on Rupali Chakankar : पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील (Ashok Kharat Case) दोन नवी प्रकरणे समोर येत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केले आहेत. याच खरातच्या भक्त असलेल्या रुपाली चाकणकर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांना राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी चाकणकर या एसआयटी चौकशीला सामोरे जाणे टाळत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
अशोक खरात प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी केली जात आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, सोमवारी त्या चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. पण त्यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले. त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ असल्याचे नमूद करत ही चौकशी टाळली आहे. यावरुन अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली.
हे देखील वाचा : सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर? जिल्हा परिषद ‘अपहरण नाट्या’चे पडसाद
अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, “रुपाली चाकणकर या चौकशीसाठी एसआयटीसमोर जाणार नाहीत, अशी माहिती मला मिळाली. त्यांनी दिलेलं कारणही क्षुल्लक होतं. मी महिला आहे. मला प्रवास करायला त्रास होईल, असे त्यांनी सांगितले. पण यापूर्वी आपण रुपाली चाकणकर यांना अनेकदा नाशिकला जाताना पाहिले आहे. तिकडे जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसताना, केक खाताना रुपाली चाकणकर यांना पाहिले आहे. मात्र, आता त्यांनी एसआयटी चौकशीला नकार दिला आहे,” अशी टीका दमानिया यांनी केली आहे.
हे देखील वाचा : चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, “चाकणकर यांना खरोखर काही लपवायचे नसते, तर त्या नक्कीच गेल्या असत्या, पण आज त्या चौकशीसाटी एसआयटीकडे गेल्या नाहीत, त्यावरून आपल्याला बरेच काही कळते आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना एक साधा प्रश्न आहे. अशोक खरतांच्या प्रकरणावर तुमचे मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कसं बोलत नाहीत?” असा प्रश्न दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित केला.