1. बिहारमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक
2. असदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्याने खळबळ
3. एनडीए जिंकल्यास नितीश कुमारांची खुर्ची धोक्यात
Bihar Election 2025: बिहारमध्ये या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहारमध्ये राजकारण तापले आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप, कॉँग्रेस, एमआयएम, राजद सर्व अन्य पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. एनडीएची सत्ता आल्या सकोण मुख्यमंत्री होणार याबाबत त्यांनी दावा केला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये ‘न्याय यात्रा’ सुरू केलेली आहे. मात्र त्यांनी बिहारमध्ये एंट्री घेताच एक खळबळजनक दावा केला. या दाव्याने बिहारचे राजकारण तापले आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले यावेळेस बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला आणि एनडीएचे सरकार आल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावा, असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत. यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री होईल असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षाची बिहारमध्ये चांगली पकड आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सीमांचल भागात 5 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती.
यंदाच्या निवडणुकीत देखील असदुद्दीन ओवैसी विधानसभेच्या किती जागा लढवतात आणि जिंकतात आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणात काही उलथापालथ होणार का हे पहावे लागेल.
बिहारच्या राजकारणात यादवांचा ‘अस्त’ होणार?
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात 13 ऑक्टोबर रोजी कोर्ट निर्णय देणार आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात कोर्ट 13 ऑक्टोबर रोजी आरोपी निश्चित करणार आहे. या प्रकरणात लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांना सीबीआयने आरोपी केले आहे. 13 ऑक्टोबर रोजी राउज एव्हेन्यू कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. कोर्टाने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांना कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
India Politics: बिहारच्या राजकारणात यादवांचा ‘अस्त’ होणार? ‘या’ घोटाळ्यात कोर्टाने दिला महत्वाचा आदेश
आयआरसीटीसीशी संबंधित हॉटेल्सच्या देखभालीचे टेंडर देण्यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये तेजस्वी यादव, लालू यादव आणि राबडी यादव यांच्या नावाचा देखील समावेश आहे. या प्रकरणात कोर्ट 13 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. कोर्ट नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.