Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election: ‘बदला हा वेळेचा अपव्यय’; पक्षातून हकालपट्टीनंतर बाळ मानेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा

Vidhan Parishad Election: शिवसेना उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियाद्वारे बाळ माने यांच्यावर कारवाई केल्याची माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बाळ माने यांचा उल्लेख 'गद्दार' असा करत तीव्र शब्दांत टीका केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 05, 2026 | 12:28 PM
Kokan Politics, Vidhan Parishad, MLC Election 2026, Bal Mane, Aniket Tatkare

Kokan Politics, Vidhan Parishad, MLC Election 2026, Bal Mane, Aniket Tatkare

Follow Us
Follow Us:
  • बाळ मानेंकडून उमेदवारी अर्ज मागे
  • संजय राऊत  यांनी सोशल मीडियाद्वारे बाळ माने यांच्यावर कारवाई केल्याची माहिती
  • बाळ मानेंचे व्हाट्सअप स्टेटस
Kokan Vidhan Parishad Election: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण बाळ माने यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माने यांच्या अर्ज मागे घेण्यामुळे महायुतीचे उमेदवारी अनिकेत तटकरे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आणि कोकमातील ही निवडणूक बिनविरोध झाली.

बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात उमेदवारी अर्ज मागे घेतला. लक्षणीय बाब म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मंत्री नितेश राणे हेदेखील उपस्थित होते. या घडामोडींनंतर ठाकरे गटात संताप उसळला. या प्रकारानंतर अवघ्या काही तासात तातडीने कारवाई करत बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी केली.

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! मविआ उमेदवार बाळ माने यांनी घेतला अर्ज मागे, पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

संजय राऊतांकडून कारवाईची घोषणा

शिवसेना उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियाद्वारे बाळ माने यांच्यावर कारवाई केल्याची माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बाळ माने यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत तीव्र शब्दांत टीका केली.

व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे नवी चर्चा

बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या दोन स्टेटसची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. बाळ मानेंनी त्यांच्या एका स्टेटसमध्ये, “मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याच दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास बाहेर पडतात” असा संदेश दिला आहे. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये “Revenge is just waste of time” (बदला हा वेळेचा अपव्यय आहे) असे म्हटले आहे.

उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च, संजय राऊत यांचे महायुती सरकारवर गंभीर आरोप

 

या संदेशांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर बाळ मानेंनी त्यांच्या एका दुसऱ्या स्टेटसमध्ये एम.एस. गोळवळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.

पाच जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपूर या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात असून, बाळ माने यांच्या माघारीने कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

 

 

Web Title: Bal manes whatsapp status becomes a topic of discussion after withdrawing his candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Kokan Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.