Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! मविआ उमेदवार बाळ माने यांनी घेतला अर्ज मागे, पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 04, 2026 | 03:36 PM
Shivsena Thackeray camp expels Bal Mane, Bal Mane withdrawing nomination from Kokan Vidhan Parishad Election, Kokan Vidhan Parishad Election, Bal Mane News,

Shivsena Thackeray camp expels Bal Mane, Bal Mane withdrawing nomination from Kokan Vidhan Parishad Election, Kokan Vidhan Parishad Election, Bal Mane News,

Follow Us
Follow Us:

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार, ४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता मोठी बातमी येत असून रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात १७ विधान परिषद मतदारसंघांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. आधी जागावाटपावरून आणि आता उमेदवारीवरून जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही राजकीय घडामोडीना वेग आला आहे. कोकण मतदारसंघातले ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासह रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज माघारी घेतला. बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकणातील निवडणूक बिनविरोध होणार आहे.

संजय राऊत यांनी दिली बाळ मानेंच्या हकालपट्टीची माहिती

संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत हि माहिती दिली आहे. ते म्हणाले, “बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे!”

बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026

बाळ माने यांची प्रतिक्रिया

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या वतीने मी शिवसेना ठाकरे गटाकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या छानणीत सहाच्या सहा उमेदवार वैध ठरले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीत १०१८ मतदार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आमचे २०० च्या आसपास संख्याबळ आहे. लोकशाहीत निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध निवडणुका होऊ नयेत या मताचाच मी होतो. परंतु, गेल्या चार-पाच दिवसात मी मतदारांच्या भेटीच्या निमित्ताने काही जणांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेले आहेत.”

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का

ते पुढे म्हणाले, “मी फॉर्म भरताना सुद्धा चार फॉर्म भरले होते. एका फॉर्मला १० सूचक लागतात. ठाकरे गटाचे ५५ नगरसेवक या मतदारसंघात होते. मला ४० सह्या मिळाल्या. महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या मिळाव्यात अशी विनंती केली होती. मी अनेक वेळा विनंत्या करूनदेखील मला सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे, माझया मनात शंकेची पाल चुकचुकली. आज मी पाहिलं कि घोडेबाजार सुरु झालेला होता, असं माझ्या कानावर आलं. घोडेबाजार करून निवडणूक लढावं हे काही कोकणच्या संस्कृतीला हिताचे नाही. त्यामुळे मी विचार करून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

Web Title: Shivsena thackeray camp expels bal mane after withdrawing nomination from kokan vidhan parishad election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
1

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
4

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.