Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena-BJP Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Shivsena-BJP Politics: बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी होताना भाजपने शिंदे गटाला अडीच वर्षांनंतर सभापदीपद देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. असा दावा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 20, 2026 | 01:47 PM
Bhandara APMC Election Results 2026, Ashu Vanjari Bhandara APMC Chairman,

Bhandara APMC Election Results 2026, Ashu Vanjari Bhandara APMC Chairman,

Follow Us
Follow Us:
  • भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर
  • भाजपकडून अडीच वर्षांनंतर सभापदीपद देण्याचे लेखी आश्वासन
  • मित्रपक्षांनी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला शह
Bhandara APMC Election Results 2026: मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. अनेकदा उघडपणे हे वाद समोरही आले आहेत. अशातच आता राज्यात सत्तेत असले तर भंडाऱ्याच्या राजकारणात मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मित्रपक्षांनीच मोठा डाव टाकल्याचे समोर आले आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील भाजपच्या सभापतींविरोधात शिंदे गटासह इतर मित्रपक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव यशस्वी ठरला आहे. भाजपचा सभापती पायउतार झाल्यानंतर शिंदे गटाचे आशु वंजारी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पण या राजकीय घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

अडीच वर्षांनंतर सभापदीपद देण्याचे लेखी आश्वासन

बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी होताना भाजपने शिंदे गटाला अडीच वर्षांनंतर सभापदीपद देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. असा दावा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. पण भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संचालकांनी एकत्र येत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 सदस्य संख्या आहे. पण निवडीवेळी भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने शिंदे गट, अजित पवार गट यांनी याच संधीचा फायदा घेत इतर अपक्ष आणि काँग्रेसच्या मदतीने सभापती पदाची निवडणूक घेतली. यात १५-० अशा मतांनी शिंदे गटाचे आशू वंजारी यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.

Pune Anti Encroachment:  अतिक्रमाणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणा

काँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला शह

राज्य पातळीवर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुका व सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला शह दिला आहे. “शब्द पाळला नाही, म्हणून सत्ता बदलली,” असा संदेश यातून देण्यात आला असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर महायुतीसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.

आशू वंजारी नवे सभापती

भंडाऱ्यात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. सत्तेत असलेल्या भाजपने अडीच वर्षांपूर्वी दिलेली लेखी आश्वासन न पाळल्याने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला होता. आज या उठावाचा निकाल समोर आला असून, 18 सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने 15-0 अशा एकतर्फी मतांनी शिवसेनेच्या आशू वंजारी यांनी सभापती पदाची ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता आली असून, भाजपावर मात्र सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड झाली आहे?

    Ans: भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर झालेल्या निवडीत शिवसेना (शिंदे गट) चे आशू वंजारी यांची १५-० मतांनी सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.

  • Que: शिंदे गटाने भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला?

    Ans: भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दाव्यानुसार, सत्तेत सहभागी होताना भाजपने शिंदे गटाला अडीच वर्षांनंतर सभापतीपद देण्याचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला.

  • Que: या सत्तांतरात कोणते पक्ष एकत्र आले होते?

    Ans: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस आणि अपक्ष संचालकांनी एकत्र येत आशू वंजारी यांना सभापतीपदी निवडून दिले.

Web Title: Bhandara apmc election results 2026 ashu vanjari elected chairman bjp ousted as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.