Rahul Gandhi Chicago Speech: "मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात- राहुल गांधींचे विधान
पुढील आठ महिन्यांत मोठा राजकीय परिणाम दिसेल- राहुल गांधी
जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत द्विपक्षीय संवाद अशक्य- राहुल गांधी
Rahul Gandhi Chicago Speech: केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात असून मोठी परिणाम तुम्हाला दिसून येईल, असा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी सध्या शिकागो दौऱ्यावर असून तेथे झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी काही दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात असून ते सरकारमधील घडामोडी माहिती आम्हाला देत आहेत. भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचनाही कोलमडली आहे. या सगळ्याचा पुढच्या आठ महिन्यांत या राजकीय परिणाम दिसून येईल.
Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!
कार्यक्रमादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांवरही भाष्य केलं.” जोपर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत राहील, तोपर्यंत संवाद अशक्य आहे. रक्तपात आणि संवाद एकत्र नांदू शकत नाहीत. संवाद होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद संपवला पाहिजे. जोपर्यंत इस्लामाबाद सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेची शक्यता राहुल गांधींनी फेटाळून लावली.
पाकिस्तानकडून आपल्या देशातील दहशतवादाला मिळणारा पाठिंबा आणि प्रोत्साहन हे अजिबात स्वीकारार्ह नाही. एकीकडे निष्पाप लोकांची हत्या होत आहे आणि दुसरीकडे आपण पाकिस्तानसोबत वाटाघाटी करत आहोत, ही परिस्थिती आम्ही स्वीकारू शकत नाही. त्यामुळे, ज्या क्षणी हे सर्व थांबेल, त्या क्षणी संवादाची शक्यता निर्माण होऊ शकते, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा
निवडणुकीत गडबडीचा आरोप असेल तर विरोधक बहिष्कार का घालत नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकांवर बहिष्कार घालणे म्हणजे भारतीय लोकशाहीची रचनाच कमकुवत करण्यासारखे असल्याचे म्हटले. विरोधक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे थांबवणार नाहीत. राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे काही फरक विरोधकांना समजत नव्हते. मात्र, त्यावेळी आरोप सार्वजनिकपणे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे नव्हते. नंतर पुरावे मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांनाही त्याबाबत माहिती दिली होती. मात्र, या विषयावर सार्वजनिकपणे बोलू नये, असे त्यांना सांगण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.






