Chandrashekhar Bawankule expressed feelings about the Ghar Ghar Chalo campaign
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन दीड महिना होऊन गेला असून सत्ताधारी महायुती जोरदार कामाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी दारुण पराभवाचं खापर मित्रपक्षांवर फोडत आहे. मविआमधील अंतर्गत नाराजी आता समोर आली असून आता यावरुन विरोधकांनी देखील टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.
भाजपकडून घरघर चलो अभियान सुरु करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे भाजपने संघटना बांधणीची तयारी सुरु केली आहे. याबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज आमच्या पक्षाचे संघटन पर्वाच घरघर चलो अभियान होत आहे. महाराष्ट्राच्या एक लक्ष बूथ वर अध्यक्ष ते प्रदेशअध्यक्षपर्यंत सर्व संघटना एक बूथ वर आम्ही जातो आहे. दीड कोटी सदस्य संख्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतोय. 12 तारखेला शिर्डीला अधिवेशन आहे. लोकांनी आम्हाला जी तीन कोटी सतरा लाख मत दिली आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अधिवेशन मध्ये आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत. गतिशील पणे महाराष्ट्र पुढं जाण्यासाठी महसुल अजेंडा पडण्याचा आहे, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीड हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मला वाटतं वस्तुस्थितीवर गेला पाहिजे धनंजय मुंडे यांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट तपासामध्ये येत नाहीत ज्या दिवशी ते तपासा देतील त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तपास मजबूत आहे आरोपी कोर्टातून सुटणार नाही यासाठी सरकार काम करत आहे योग्य तपास सुरू आहे. राजीनामामध्ये कोणाचा कस काढायचा नाही,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “मी सुरेश धस यांना भेटलो आहे. उद्याही भेटणार आहे नेमकं या प्रकरणात राजकारण झालं आमच्याकडून किंवा कोणाकडून तपासाला वेगळं येतं आपले विरोधी पक्षाचे सर्वांची जबाबदारी आहे की या प्रकरणांमध्ये जागृती आहे त्याला शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एकजूटपणे काम केले पाहिजे. मला या प्रकरणात कोणावर आरोप करायचा नाही मात्र आरोपीला मदत नाही झाली पाहिजे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले नाही पाहिजे,” असे मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे जोरदार राजकारण रंगले. यावरुन आता बावनकुळे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले. हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी सोडला म्हणून ते भाजपमध्ये येत आहोत. त्यांचे आणि भाजपचे विचार सारखे आहेत. हिंदुत्वाचे विचार आहेत म्हणून त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांनी कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी ते भाजपमध्ये आले आहेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.