badlapur akshay Shinde Encounter
मुंबई : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणामुळे एका बाजूला अशा प्रकरणामध्ये आरोपीला हीच शिक्षा द्यायला हवी अशी भावना आहे. तर दुसरीकडे संशयाची सुई असल्याचे व्यक्त केले आहे. त्यामुळे हा एन्काऊंटर चर्चेचा विषय ठरला आहे. एन्काऊंटरपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता सत्ताधारी भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का..? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलं आहे.
चित्रा वाघ यांनी बदलापूर प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. प्रकरणातील आरोपीला शिक्षा देण्यात यावी असे म्हणत आंदोलनकर्त्यांवर त्यांनी गंभीर आरोप केला होता. आता अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेला देखील चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ शेअर करत विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. व्हिडिओ शेअर करताना चित्रा वाघ यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या म्हणणाऱ्या विरोधक आता चौकशीची मागणी करत असल्यामुळे रोष व्यक्त करत आहेत. विरोधक अशा प्रकरणामध्ये देखील राजकारण करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
हे देखील वाचा : अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा टाहो; मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, “बदलापूरचा हरामखोर नराधम ठार झाला… त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात…किती दुटप्पीपणा?आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची..?बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का..? की नुसते राजकारण करणार..? राजकारण करणार्यांना या विरोधकांना लाज वाटली पाहिजे…” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
बदलापूरचा हरामखोर नराधम ठार झाला… त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात…
किती दुटप्पीपणा ? आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची..? बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का..?
की नुसते… pic.twitter.com/TqcTyRzm3P — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 23, 2024