BJP leader Girish Mahajan is upset after Chhagan Bhujbal takes oath as a minister.
नाशिक : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महायुतीचे दुसऱ्यांदा राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज होते. यानंतर आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहेत. तसेच भुजबळांच्या मंत्रिपदामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय विधानांमधून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद दिले असून ते देखील त्या खात्याचा कारभार सांभाळणार असल्याचे सांगितले. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे शिवाय होणारच नाही. पालकमंत्री पदावर दावा करणं काय वाईट आहे, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते अजून काही होऊ शकतात…तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा अनेक दिवसांपासून चिघळला आहे. यामध्ये आता छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे नाशिकच्या मंत्रिपदाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे कुणाला पालकमंत्री करायचं कुणाला मंत्री करायचं. असं कोणी काही म्हटलेलं नाहीये, तुम्ही पत्रकार फक्त त्यामध्ये तेल टाकू नका. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असणे काय चुकीचा आहे? चांगलं आहे. ते तर म्हणत असतील की मी होणार आहे तर ते दावा करू शकतात चांगले आहे स्वागत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तेथे सुद्धा त्यांना करू शकतात, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असली त्यांचा यामधून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडकी बहीण योजना ही महायुतीच्या नेत्यांमध्ये नेहमी चर्चेमध्ये असलेला विषय आहे. महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा आला असल्याचे कबुल केले आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी देखील वक्तव्य केले होते. याचे प्रत्य़ुत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, हे लिखितच आहे. यात त्यांनी काय नवीन सांगितलं. हा काही गौप्यस्फोट आहे का? जवळपास 30 हजार कोटी खर्च हा त्यामुळे वाढलेला आहे. याबाबत यापूर्वी अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देणं क्रमप्राप्त आहे. मात्र कुठलाही निधी नियमबाह्य वळणार नाही हे सुद्धा बघायचं आहे. निधीची कुठल्याही पद्धतीने अशी पळवा पळवी होणार नाही. मला वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट मत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मांडले आहे.