Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Deputy Mayor : “जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा…”, नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

महानगरपालिकेचा भाग असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात असंतोष उफाळून येत आहे. पक्षप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा जाहीर केल्याने पक्षांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 04:54 PM
जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा...", नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा...", नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

Follow Us
Follow Us:

Nashik Deputy Mayor News in Marathi : शिवसेना शिंदे गटात उशिरा दाखल झालेले विलास शिंदे यांना नाशिकचे उपमहापौरपद दिल्याने पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महागरप्रमुख आणि नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी यांनी पद डावलल्याच्या रागातून पक्षाच्या महागरप्रमुख पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला होता.

प्रवीण तिदमे हे उपमहापौरपदाचे इच्छुक होते. त्यांना अर्जही दाखल केला होता. मात्र पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावत विलास शिंदे यांना उपमहापौर केलं. त्यामुळे प्रवीण तिदमे यांना आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून प्रवीण तिदमो दोन दिवस नॉटरिचेबल होते. त्यांनी त्यांचा फोन बंद करून ठेवला होता. याचदरम्यान सोमवारी (९ डिसेंबर) आज ते आपला महानगरप्रमुख पदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांना समजावले आणि त्यानंतर तिदमे यांनी आपली तलवार म्यान करून महानगरप्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी (दि.९) पत्रकारपरिषद घेत तिदमे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

प्रवीण तिदमे काय म्हणाले?

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करुन गैरसमज दूर केले आहेत आणि माझ्यासह सर्व नगरसेवकांना मंगळवारी भेटण्यासाठी बोलाविले आहे. आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडणार आहोत, त्यामुळे,पक्षाच्या आदेशानुसार मी माझ्या महानगर प्रमुख पदाचा आणि जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नाशिक महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेना पक्षात नाराज होऊन शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी महानगरप्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर करुन नॉट रिचेबल झाले होते. सोमवारी सकाळी प्रविण (बंटी) तिदमे यांनी पत्रकार परिषद घेतली. याकाळात विविध पक्षातील पदाधिकारी, ज्येष्ठ संपादक, पत्रकार, नागरिकांनी कुटुंबियांशी संपर्क साधून राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर, रविवारी आणि सोमवारी सकाळी माझे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, आ. सुहास अण्णा कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर, संपर्क प्रमुख राम रेपाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क झाला. नगरसेवकांवर अन्याय होणार नाही असे स्पष्ट शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

Web Title: Uttar maharashtra pravin tidme resignation withdrawn eknath shinde intervenes shiv sena shinde faction news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Nashik Politics

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.