
Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी (६ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर आज आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. एका भाजप नेत्याने दिल्ली आणि बिहार या दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही भाजप नेत्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पण, भाजपने आपचा हा दावा फेटाळून लावत ‘आप’ निवडणुकीतील पराभवाच्या निराशेतून खोटी माहिती पसरवत असल्याचा पलटवार केला आहे.
पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा आणि दिल्ली भाजप पूर्वांचल मोर्चाचे अध्यक्ष संतोष ओझा यांसारख्या नेत्यांनी दोन्ही राज्यांमध्ये मतदान केले. निवडणूक आयोगाने डुप्लिकेट मतदार काढून टाकले असतानाही भाजप नेत्यांनी “मोठ्या प्रमाणात मतदारांची फसवणूक” केली आहे. भाजपने लोकशाहीची थट्टा केली आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आप नेत्याने त्यांच्या ट्विटर एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भाजपने मतदारांची पद्धतशीर ओळखपत्र तयार करून त्यांना बिहारला पाठवल्याचा आरोप केला आहे भाजपचे करनाल भाजपचे करनाल जिल्हाध्यक्ष स्टेशनवर उपस्थित होते आणि भाजपने रेल्वे तिकिटे आणि प्रवासाची व्यवस्था केली. यामुळे बिहारमधील मतदारांची संख्या गेल्या ७५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. भाजपने निवडणूक निकाल आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही सुनियोजित योजना आखली असल्याच आरोपही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
Bihar elections: तेजस्वी यादवने बजावला मतदानाचा हक्क
भाजप नेत्यांनी जरांगे प्रकरणातील आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. भाजप खासदार राकेश सिन्हा म्हणाले, “त्यांचे नाव दिल्ली मतदार यादीतून वगळून बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील मानसेरपूर गावात नोंद करण्यात आले आहे. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी दोनदा विचार करावा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजप नेते संतोष ओझा म्हणाले, “बक्सर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीसाठी त्यांनी आधीच बिहारच्या मतदार यादीत नाव नोंदवले आहे. दिल्लीतील पराभवामुळे निराश झालेल्या ‘आप’ नेत्यांनी भाजपला बदनाम करण्यासाठी खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप ओझा यांनी केला.
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर ६४.६९% मतदान झाले. हे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे, जे १९५१ पासूनचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. “बिहारने संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. १९५१ नंतरचा हा सर्वाधिक मतदानाचा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपा के @RakeshSinha01 , @santoshojha के विषय में @BJP4India अपनी बात रखें और लाखों लोग जिन्हें भाजपा ने बिहार में वोट डालने भेजा है उनपर भाजपा का क्या कहना है ? pic.twitter.com/skDA0UxbRO — Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) November 7, 2025