राजद नेते तेजस्वी यादव मतदानाचा हक्क बजावला सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Tejashwi Yadav on Bihar elections : बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज (दि.06) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राजद नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेला त्यांचे वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यादव यांनी तेच जिंकतील आणि १४ तारखेला बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारी जनतेला मतदान करण्याचे आवाहन देखील केले. हे आवाहन करताना त्यांनी शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी देणारे सरकार निवडण्याचे आवाहन केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले तेजस्वी यादव?
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “आपण सर्व मिळून बिहारला नंबर वन बनवायचे आहे, एक नवीन बिहार निर्माण करायचा आहे जिथे शिक्षण, औषध, उत्पन्न, सिंचन, सुनावणी आणि कृती देणारे सरकार असेल, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीपासून मुक्त सरकार असेल. आपण असे सरकार स्थापन करायला हवे जे तरुणांवर लाठीमार करणार नाही किंवा पेपर लीक करणार नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत.
#WATCH | पटना: RJD नेता और महागठबंधन के मुख्यमंत्री पद के उम्मीदवार तेजस्वी यादव ने बिहार विधानसभा चुनाव के पहले चरण के तहत मतदान किया।#BiharElection2025 pic.twitter.com/EXK6Dg4fZF — ANI_HindiNews (@AHindinews) November 6, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, आम्ही बिहारमधील सर्व लोकांना त्यांचे वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदान करण्याचे आवाहन करतो. जो तुम्हाला नोकऱ्या, रोजगार, चांगले शिक्षण, वैद्यकीय सेवा, शिक्षण, औषध आणि उत्पन्न देईल त्याला मतदान करा. आपण जिंकू, बिहार जिंकेल. १४ तारखेला एक नवीन सरकार स्थापन होणार आहे.” असा ठाम विश्वास महागठबंधनाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला आहे.






