
BJP minister Mangal Prabhat Lodha criticized the joint interview of the Thackeray brothers
मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर निशाणा साधला आहे. ठाकरे बंधूंनी बिझनेसमन गौतमी अदानीवर टीका केली. गौतम अदानी मोदी सरकार आल्यानंतर मोठे झाले असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी केला. याबाबत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, धारावीचा पुनर्विकास संदर्भात तेथील लोकांना तसेच ठेवायचं का..? सर्वजण आरामात असतात मात्र धारावी मधील लोक कशा स्थितीत राहतात.. तिथला पुनर्विकास करायचा नाही का.. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागात ते विकसित करून घरे देत असतील त्यात चुकीचं काय, असा प्रश्न मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव..! राज-उद्धव ठाकरेंनी घेतला सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार
पुढे त्यांनी पालिका निवडणुकीच्या पूर्वी युती करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर देखील निशाणा साधला. मंगल प्रभात लोढा म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत त्यांचे आरोप हे पब्लिसिटीकरता असतात. त्यापेक्षा अधिक काही नाही. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा दुसरा भाग येऊ द्या किंवा तिसरा भाग येऊ द्या.. जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे, असा विजयी विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्या २६ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, बंडखोरी करणे हे चुकीचं काम असल्याने चुकीच्या कामाला शिक्षा झाली पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून अनुशासित पक्ष आहे. म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला आहे , अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.