Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satish Bhosale Arrested : पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी…;पंकजा मुंडे यांनी सतीश भोसले याच्या अटकेवर दिली प्रतिक्रिया

मागील अनेक दिवसांपासून पोलीस सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मागावर होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे,

  • By प्रीति माने
Updated On: Mar 12, 2025 | 12:00 PM
bjp Minister Pankaja Munde's reaction on Satish Bhosale's arrest

bjp Minister Pankaja Munde's reaction on Satish Bhosale's arrest

Follow Us
Follow Us:

बीड : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाली आहे. त्याने बीडमध्ये पितापुत्रांना अमानुषपणे मारहाण केली होती. याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली. या सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेतले. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसले याच्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर यावर आता भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या हा मागील काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र पोलिसांनी सतत तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. अखेर महाराष्ट्र व उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सुरेश धस हे भाजप आमदार आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी, असे स्पष्ट मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी डिसेंबर महिन्यामध्ये केली आहे. 11 डिसेंबरला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन कोणताही संबंध नसताना वैयक्तिक टीका केली.मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस आमच्यावर थेट आरोप करत आहेत. याबाबत देखील मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. हे करणं सुरेश धस यांनी अपेक्षित नाही, त्यांनी ते करु नये. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहचू नये म्हणून मी मागच्या चार महिन्यांपासून गप्प बसले आहे. नागपूर अधिवेशनापासून आत्तापर्यंत मी गप्प बसले आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी अचानक मंत्री झाल्यानंतर बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे धस यांना का दिसू लागलं आहे? माझा काही संबंध नसल्याने माझं नाव घेण्यात आले. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते तर सुरेश धस हे आमदार आहेत. त्यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडबाबत का तक्रार केली नाही? असे सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

बातमी अपडेट होत आहे

Web Title: Bjp minister pankaja mundes reaction on satish bhosales arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • Pankaja Munde
  • Santosh Deshmukh Murder
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

‘पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल…’; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा
1

‘पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल…’; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा

Pankaja Munde On Political Exit:  कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Pankaja Munde On Political Exit: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान
3

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.