bjp ministry chandrashekhar bawankule target mla rohit pawar over Company fine waived
Rohit Pawar vs Bawankule : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात सध्या सर्वत्र गाजते आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना फुले अर्पण करताना देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. मात्र ही जाहिरात नक्की कोणी दिली हे समोर आले नसून यावरुन वाद निर्माण झाला आहे. जाहिरातबाजी आणि त्यातील पैसे यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. एका कंपनीचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बावनकुळे यांनी पुरावा मागितल्यानंतर रोहित पवार यांनी पुरावा देखील सादर केला आहे. मात्र हा पुरावा दाखवल्यानंतर बावनकुळे यांनी रोहित पवारांमध्ये अपरिपक्वतेची लक्षणे असल्याचे म्हणत टीका केली आहे.
जाहिरातीवरुन सुरु झालेल्या या वादामध्ये आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. एका कंपनीचा 90 कोटींचा दंड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफ केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. यानंतर पुरावा द्यावा असे म्हटल्यानंतर रोहित पवार यांनी विधीमंडळातील प्रश्न उत्तराची प्रत जोडली आहे. यामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रश्न विचारला आहे. यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून रोहित पवारांवर निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रोहित पवारांनी काल मी एका कंपनीला 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे असा आरोप लावला होता, मी आज सांगितलं की, रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा, आता ते म्हणत आहेत की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता, खरंतर पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे रोहित पवार म्हणत आहेत, त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती, कुठलाही दंड माफ केला नाही. म्हणून मी म्हटले आहे की राजकीय संन्यास घ्यावा, प्रसिद्धीच्याच झोतात राहण्याकरिता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातून मिळू पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
कुठलाही दंड तेव्हाही माफ केलेला नव्हता
पुढे ते म्हणाले की, खोट्या आरोपातून कधीही प्रसिद्धी मिळत नाही, राजकीय आरोप करताना उठसुट आरोप करून राजकीय उंची आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचे लक्षण रोहित पवारांचं आहे.राजकारणात ते नवीन आहेत,आधी अभ्यास करावा आणि मगच त्यांनी कुठलाही आरोप लावावा. 11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता, तो मागच्या काळात झालेल्या प्रश्न बाबत होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या दिलेला आहे. एका उत्खनच्या प्रकरणात कुठलाही दंड तेव्हाही माफ केलेला नव्हता आताही दंड माफ केलेला नाही, अशी भूमिका बावनकुळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बावनकुळे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे. त्यांना विरोधी पक्षात मी एकटाच लढवय्या आहे असं दाखवायचं आहे…म्हणून जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाचेही महसूलमंत्र्यांनी केवळ स्थगिती दिली होती. आणि माझ्या कार्यकाळात कधीही कुठलाही दंड माफ केला गेला नाही. रोहित पवारांनी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा, लोणीकर या प्रकरणातही कुठला दंड माफ केलेला नाही,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर केली आहे.