खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणूक 2025 वरुन भाजपवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Vice Presidential Election 2025 : मुंबई : दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून उद्या (09 सप्टेंबर) मतदान होणार आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये राजकीय खडाजंगी रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पितृपक्षामध्ये निवडणूक घेत असल्यामुळे भाजप सिक्युयर झाली असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत खासदार राऊत यांनी टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक आहे. सर्वातआधी भाजपच अभिनंदन केलं पाहिजे. एरवी भाजप मुहूर्त काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतो, हिंदुत्वादी पक्ष म्हणून. यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. भाजप सेक्युलर झाला. मुहूर्त, पंचाग पाहत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, या बद्दल त्यांचं अभिनंदन,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचाग पाहणार, तिथी पाहणार म्हणून भाजपने दहा वर्षात पहिल्यांदाच स्वत:ला सेक्युलर घोषित केल्यासारखं वाटतय. पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. येणाऱ्या उपरराष्ट्रपतींनी सावध रहायला पाहिजे. कारण आधीच्या उपराष्ट्रपींच काय झालय, अद्याप कळायला मार्ग नाही. जो पर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही, तो पर्यंत ते गायब आहेत. त्यांच्याविषयी शंका कायम राहतील” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लालबाग विसर्जन मिरवणूकीला उशीर झाला असून यावरुन अनेकांनी जोरदार टीका केली आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन चंद्रग्रहण सुरु असताना झाले असल्याचे आहे. लालबागच्या राजाच्या व्यवस्थापनाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “यावर कसं काय मत व्यक्त करु. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी अद्याप कधी तिथे गेलो नाही. “मी गणपती दर्शन करत असतो. कोणी बोलावल, तर जातो. घरी गणपती असतो. पण मी तिकडला प्रकार एकंदरीत दिसतो. ते पाहिल्यावर मला वाटलं की त्या गर्दीत अजून एकाची भर नको. लोकांनाही कळल पाहिजे. हिंदूत्ववादी असतील, श्रद्धा असेल गणपती घरातला, देव्हाऱ्यातला इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती एकच असतो. अलीकडे मला दिसतय लालबागचा राजा अमित शाहना जास्त पावतो. मराठी माणसाला तो जास्त पावताना दिसत नाही. मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल, तेव्हा मी त्या गणपतीच्या दर्शनाला नक्की जाईन,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.