bjp mla suresh dhas reaction on son sagar dhas accident political news
Suresh Dhas Son Accident : बीड : आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. चार चाकी गाडी चालवणारा चालक हा सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस होता. या प्रकरणामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधीमंडळाच्या आवारामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझा मुलगा रेग्युलर चेकअपसाठी डॉक्टरकडे गेला होता. तो आमच्या घरुन पावणे नऊ वाजता निघाला होता. आणि 10.30 वाजण्याच्या सुमारास तो त्या पॉईंटवर आला. दुर्दैवाने तो मुलगा नितीन शेळके यांचं तिथे हॉटेल आहे. तो पटकन त्यावेळी गाडीच्या पुढे आडवा आला. दुर्दैवाने तो अपघात झाला. माझ्या मुलाने आणि त्याच्य़ा चुलत भावाने उचलून त्याला दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तिथे दुर्दैवाने नेईपर्यंत सुद्धा राहू शकला नाही, अशी अपघाताची घटना आमदार सुरेश धस यांनी सांगितली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ‘या अपघातानंतर मी स्वतः माझ्या मुलाला सांगितले की तू तिथेच थांब. रितसर जी असेल ती संपूर्ण कार्यवाही झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तू तिथून निघ. माझ्या मुलाचं, ड्रायव्हरच आणि त्यांचं ब्लड सॅपल घेण्यात आले आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याच्यावर रितसर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोपील करत आहे. सुपा पोलीस स्टेशनमध्ये हे एफआयआर असून तिथे गुन्हा दाखल झाला आहे,” अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
माझ्याकडून कोणताही तबाव नाही
या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली होती. सुरेश धस यांच्या मुलाच्या या प्रकरणामध्ये ड्रींक अन्ड ड्राईव्ह अशी केस असल्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता सुरेश धस म्हणाले की, “माझ्या मुलाला साध्या सुपारीचे सुद्धा व्यसन नाही. त्याच्यामुळे ड्रींक अन्ड ड्राईव्ह हे फार लांब राहिलं आहे. विनाकारण गैरसमज करत असतात. मी तबाव वापरण्याचा प्रयत्न केला नाही. मी जिल्ह्याच्या एसपी असू किंवा कोणालाही मी फोन केलेला नाही. रितसर कारवाई झालेली आहे. दुर्दैवाने हा अपघात झाला आहे. पोलिसांनी कारवाईबाबत तप्तरता दाखवली आहे. माझं याबद्दल काहीही मत नाही,” अशी भूमिका भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अपघातामध्ये नितीन शेळके यांचा मृत्यू
आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने मागून जोराची धडक दिली आहे. त्यानंतर नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.या अपघात प्रकरणातील मृत तरुण नितीश शेळके याचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके याने या अपघातानंतर पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार मृत तरुण नितीन शेळके हा हिरो कंपनीच्या मोटारसायकलने जातेगाव फाटा येथे नगर-पुणे रोड ओलांडत होता. यावेळी एमजी कंपनीची कार भरधाव वेगाने आली. या कारने नितीन शेळके याच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.