Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे विरुद्ध राणे वाद-विवाद सुरुच! उद्धव ठाकरे हा ‘ढ’ विद्यार्थी; नितेश राणेंनी पुन्हा डिवचले

नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा राजकीय वादंग होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना ढ विद्यार्थी बोलून डिवचले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 28, 2025 | 03:00 PM
bjp nilesh rane target uddhav thackeray political news

bjp nilesh rane target uddhav thackeray political news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. यामध्ये अनेक विषयांवरुन राजकारण रंगले. दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणावर देखील राजकारण रंगले. या प्रकरणामध्ये दिशा सालियान हिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा दावाकेला होता. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर तिच्या घरातील अर्थिक स्थिती यावरुन तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  याला मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय वाद होताना दिसत आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंना टोला लगावला होता. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले नितेश राणे?

“गुढीपाडाव्याच्या आधी जनतेला एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला शब्द दिला होता. त्यानुसार 31 मार्च पर्यत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करुन नवीन निधीच नियोजन केलं जाईल असं मी अश्वासन दिल होतं. सोमवारी 31 मार्च आहे, 98 टक्के निधी आज पर्यंत खर्च झालाय” अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की “राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा 32 वरून राज्यात पहिल्या क्रमांकवर आणला आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार मानतो. जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेलं हे पाहिलं पाऊल आहे. आलेला निधी हा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. शेवटी निधी काढणं हे जिल्ह्यासाठी योग्य नाही. ते राणे साहेबांना देखील आवडणार नाही. जिल्ह्याच्या विकासाच्या आड जो येईल त्याला सोडणार नाही. जे अधिकारी दिरंगाई करत होते त्यांना समज दिली आहे, असे स्पष्ट मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना ढ म्हणून संबोधले आहे. नितेश राणे म्हणाले की, “गुंतवणूकसाठी आपला जिल्हा आकर्षक केंद्र बनावा यासाठी प्रयत्न करू. नरडवे धरण प्रकल्पाचे लवकरच काम सुरु होईल आणि लोकांना देखील पैसे मिळतील. मलाड पोलीस आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टबाबत दिशा सालियनच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर आर्थिक स्थिती योग्य नव्हती तर मग ती लग्न कसं करणार होती. उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यास याचा संबंध येत नाही. तो ढ विद्यार्थी आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना सौगात-ए-मोदी याच्यावर नितेश राणेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निवडणूकीवेळी बटेंगे तो कटेंगे असे नारे देण्यात आले. आता सौगात म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षेभर मुस्लीम समाजाचे नाव्याने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची. असा हा प्रकार आहे. आमच्या येथे काही उडाणटप्पू आहेत. त्यांचा उल्लेख अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये केला आहे. ते सुद्धा आता टोपी घालून सौगात घेऊन जातात हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही आमच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप करतात तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचे हे ढोंग उघड पडलं आहे. मोदी जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. आता हिंदूंच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Bjp nilesh rane target uddhav thackeray political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
4

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.