Chandrashekhar Bawankule will hold the post until a new BJP state president is elected.
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला यंदाच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. भाजपला यापूर्वी न मिळालेले असे मताधिक्य मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने संघटनात्मक स्तरावर देखील जोरदार तयारी केली. प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या निवडणूकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले आहे. यानंतर आता भाजपच्या संघटनात्मक प्रदेशाध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. कामठीमधून बावनकुळे यांनी विजय मिळवला असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देखील मिळवले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नेत्याची चाचपणी सुरु आहे. मात्र सध्या लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. मागील पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंडगे भिजत पडले आहे. अखेर पाच वर्षानंतर निवडणूका होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला संघटनात्मक मजबूती हवी आहे. यामुळे लगेचच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पद नवीन नेत्याला देणे भाजपला महागात पडू शकते. त्यामुळे सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे हेच भाजप पक्षाचा राज्यातील कारभार पाहणार आहेत.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संघटनात्मक घडी विस्कटू नये याची काळजी भाजपा घेत असल्याचे कळते. या निवडणुकीपूर्वी कोणताही संघटनात्मक मोठा बदल न करण्याचे धोरण भाजपाने घेतले आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीसह भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा बजावावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे हे दुहेरी भुमिका बजावताना दिसणार आहेत.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी लोकसभा व विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रावर खास लक्ष केंद्रीत केले होते. केंद्रीय मंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी अनेक महाराष्ट्र दौरा करुन विधानसभा निवडणुकीची तयारी केली. जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री, खातेवाटप, राज्याचे मुख्यमंत्री आणि सभागृहाचे अध्यक्ष अशा सर्वच बाबींमध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतः लक्ष घालून निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यत्र पदाचा निर्णय देखील दिल्ली आदेश असणार हे स्पष्ट आहे. अमित शाह त्याचबरोबर जे पी नड्डा हे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घेणार आहे. मात्र हा निर्णय आता स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. तो पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती कारभार राहणार आहे.