Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

वित्तीय समितीमुळे विकासकामांना वेळ लागत असून, आता सभागृह अस्तित्वात आल्याने वित्तीय समितीची आवश्यकता नसल्याने समिती बर्खास्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 01:03 PM
अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • अर्थसमिती बरखास्त करा
  • पुणे महापालिकेतील नगरसेवकांची मागणी
  • विकासकामांना उशीर होत असल्याचे कारण
पुणे : पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत वित्तीय समिती बरखास्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. वित्तीय समितीमुळे विकासकामांना वेळ लागत असून, आता सभागृह अस्तित्वात आल्याने वित्तीय समितीची आवश्यकता नसल्याने समिती बर्खास्त करण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भात माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

 

मनपाची सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी वित्तीय समितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले कि पूर्वी अंदाजपत्रकाप्रमाणे कामे केली जायची. आता प्रशासनाचा कामे करण्यावर नाही तर कामे अडविण्याकडे कल वाढला आहे. विविध विकास कामांना मंजूरी देण्याकरिता अडथळे आणले जातात. कोरोना संक्रमणाच्या कालावधीत निर्माण केलेल्या वित्तीय समितीची आवश्यकता नसताना तिची मंजूरी घेणे आवश्यक केले आहे. यामध्ये नाहक वेळ जात आहे. कामांना उशीर होतो. आता सभागृह अस्तित्वात आल्याने या समितीची आवश्यकता नाही. या विषयावर भाजपाचे धीरज घाटे यांनी सांगितले की, वित्तीय समिती कोविड संक्रमण काळात केली होती. या समितीची आवश्यकता नसेल तर तत्काळ निर्णय घेऊन समिती बर्खास्त करावी. यामुळे खूप वेळ वाया जाता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले की प्रशासक काळात वित्तीय समिती होती, त्यामुळे काही हरकत नव्हती. आता मनपा स्थायी समिती व सर्वसाधारण सभा असल्याने या वित्तीय समितीची आवश्यकता नाही. याबाबत लगेच निर्णय घेण्यात यावा. या विषयावर कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे आपले म्हणणे मांडताना म्हणाले की बीपीएमसी ऍक्टमध्ये मनपाची सर्वसाधारण सभा सर्वोच्च असते, तसेच आर्थिक विषयक निर्णय स्थायी समितीमध्ये घेतले जातात. त्यामुळे वित्तीय समितीची आवश्यकता नाही. एकाच वेळी दोन केंद्र नसतात, त्या प्रमाणे आर्थिक निर्णय घेताना स्थायी समिती सर्वोच्च असल्याने वित्तीय समिती तत्काळ बर्खास्त करावी.

या मुद्दयावर स्पष्टीकरण देताना मनपा आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, वित्तीय समितीबाबत मी स्वतः अभ्यास करतो. या समितीमुळे कोणती कामे अडली असतील किंवा अडचण आली असेल याची माहिती घेतली जाईल. या समितीमुळे त्रास होत असेल तर सर्व मिळून याबाबत निर्णय घेतला जाईल.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

Web Title: Pune municipal corporation corporators have demanded the dissolution of the finance committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
2

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
3

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
4

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.