Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ – हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

केंद्राच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे छगन भुजबळ यांनी स्वागत केले. मात्र, 2011 च्या जनगणनेबाबतच्या त्यांच्या वक्तव्यावर हरिभाऊ राठोडांनी आक्षेप घेतल्याने ओबीसी राजकारणात नवा वाद निर्माण झाला.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 03:27 PM
जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ - हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ - हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

Follow Us
Follow Us:
  • जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे छगन भुजबळांनी स्वागत केले.
  • 2011 च्या जनगणनेतील जातीनिहाय नोंदीवर हरिभाऊ राठोडांनी प्रश्न उपस्थित केला.
  • ओबीसींची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद 
 

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत सामाजिक न्यायाच्या लढ्याला ऐतिहासिक यश मिळाल्याचे म्हटले. जातनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यास ओबीसी समाजाची लोकसंख्या स्पष्ट होईल आणि विविध योजनांसाठी ठोस आधार मिळेल, असा त्यांचा दावा आहे.

भुजबळ यांच्या मते, 2011 च्या जनगणनेत जातीसाठी स्वतंत्र कॉलम नव्हता. आता जातनिहाय माहिती घेण्याचा निर्णय झाल्याने ओबीसी समाजाची वास्तविक संख्या समोर येण्यास मदत होणार आहे. जातनिहाय जनगणनेसाठी आपण अनेक वर्षांपासून आवाज उठवत असल्याचेही त्यांनी सांगितले. समता परिषदेच्या माध्यमातून 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

भुजबळांच्या वक्तव्यावर हरिभाऊ राठोडांचा आक्षेप

मात्र, ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2011 मध्ये झालेल्या प्रक्रियेत जातीनिहाय माहिती संकलित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे संबंधित आकडेवारी व्यवस्थित उपलब्ध झाली नाही. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी खर्च झाल्याचा दावाही राठोडांनी केला.

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

2011 च्या जनगणनेत जातनिहाय माहिती घेतली होती का?

राठोडांनी असा सवाल केला की, जर 2011 मध्ये जातीनिहाय माहिती संकलित करण्यात आली होती, तर त्या जनगणनेत जातीचा कॉलम नव्हता, असे भुजबळ कसे म्हणू शकतात? या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही टीका केली.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेच्या मागणीचे समर्थन करताना न्यायालयीन प्रक्रियेचाही संदर्भ दिला. ओबीसींना आरक्षण किंवा इतर लाभ देताना न्यायालयांकडून लोकसंख्येचा आधार विचारला जातो. त्यामुळे अद्ययावत जातनिहाय आकडेवारी उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

या वादामुळे जातनिहाय जनगणना हा केवळ आकडेवारीचा विषय नसून महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणासाठीही महत्त्वाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. आता केंद्राच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष जनगणनेत कोणती माहिती संकलित केली जाते आणि त्यातून ओबीसी समाजाची लोकसंख्या किती स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Chhagan bhujbal haribhau rathod caste census obc controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.