Vijay Wadettiwar target modi government over india pakistan war news update
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने पळून जात पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये अक्षय शिंदे हा ठार झाला. या एन्काऊंटरवरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे. अत्याचारी प्रकरणातील आरोपीला भर रस्त्यामध्ये फाशी द्या अशी मागणी करणारे विरोधक एन्काऊंटवरुन आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एन्काऊंटर करायचा होता, तर बृजभूषण सिंगचा का केला गेला नाही? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्यामुळे विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते सवाल विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षांना सवाल उपस्थित केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्व आपटे नाही पण जे आरोपी आपटे आहेत त्यांना वाचवण्याचा सरकार हा प्रयत्न करत आहे का? चाईल्ड तस्करी आणि पोर्नग्राफी रॅकेट आहे, ते समोर येईल. या शाळेतील एक मुलगी गायब आहे. यामध्ये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. एन्काऊंटरनंतर पेपरला जाहिराती दिल्या आहेत. कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री याचं समर्थन करत आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री यांच्या आदेशाने ही एन्काऊंटर झाला का?” असा गंभीर सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
बृजभुषण सिंग यांचा एन्काऊंटर का नाही?
पुढे विजय वडेट्टीवार यांनी महिलांनी अत्याचाराचे आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण सिंग यांचा एन्काऊंटर का नाही असे देखील विचारले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “एन्काऊंटर केलेल्या या संबंधित अधिकाऱ्याचा मागील इतिहास वेगळा आहे. तेलंगणामध्ये अशाचप्रकारे चार आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यावेळी कोर्टाने त्यांच्यावर 402 चा गुन्हा दाखल केला. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहेत ते घरात मजा मारत आहेत. ते भाजप आणि आरएसएस संबंधित आहेत. त्यांना वाचवण्याच काम सरकार करत आहे. जर एन्काऊंटर करायचा होता, तर बृजभूषण यांचा का केला नाही? किती तरुणींचा विनयभंग केला मग या त्रिकुटाने का मागणी केली नाही?” असा मोठा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.