congress president Mallikarjun Kharge angry on shashi tharoor
Mallikarjun Kharge on shashi tharoor : नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये जोरदार राजकीय वाद निर्माण झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरुन काँग्रेस पक्षाने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आली. या शिष्टमंडळाने भारत सरकारची भूमिका परदेश दौरे करुन जगासमोर मांडली आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरबाबत देशात एकतेसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेसमधूनच मतभेदांच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत स्पष्टपणे केंद्र सरकारसोबत स्पष्ट भूमिका घेतली. तसेच शिष्टमंडळामध्ये देखील समाविष्ट झाले होते. यामुळे त्यांचे पक्षामध्ये मतभेद झाल्याचे देखील दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. शशी थरुर यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले की, आमच्यासाठी देश प्रथम येतो, परंतु काही लोकांसाठी मोदी प्रथम येतात. थरूर यांच्या अलिकडच्या सक्रियतेमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उघडपणे केलेल्या कौतुकामुळे त्यांनी असे विधान केले आहे.
केंद्र सरकारने शरी थरूर यांच्यावर ऑपरेशन सिंदूरसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पक्ष नेतृत्वात याबाबत अस्वस्थता आहे. खरगे म्हणाले, थरूर यांचे इंग्रजी चांगले आहे, म्हणूनच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत ठेवण्यात आले होते, परंतु जेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला एकत्र यावे लागेल असे म्हटले तेव्हा काही लोकांचा सूर वेगळा होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोग हा मोदी सरकारचे बाहुले बनले आहे असे देखील ते म्हटले आहे. पंतप्रधान निवडणूक जिंकत आहेत असे म्हणत आहेत, पण जर तुम्ही ईडीला विचारले तर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. लोकशाही नाही तर यंत्रे जिंकत आहेत, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपहासात्मकपणे म्हटले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘संविधान बचाओ यात्रे’च्या माध्यमातून भाजपने संविधानविरोधी भूमिका स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, आणीबाणीवरील सरकारच्या अलिकडच्या टिप्पण्यांवर, खर्गे म्हणाले की ज्यांचे स्वातंत्र्यात कोणतेही योगदान नव्हते ते आता संविधानाबद्दल बोलत आहेत. शशी थरूर यांच्या भूमिकेबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दलच्या त्यांच्या वृत्तीबद्दल काँग्रेसमध्ये बराच गोंधळ आहे. खरगे यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की थरूर यांच्या स्वतंत्र मार्गाने पक्ष नेतृत्व अस्वस्थ आहे.