Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah Pune Visit: पुण्यात राजकारण तापणार! अमित शाहांचा पुणे दौरा उधळून लावण्याचा काँग्रेसचा इशारा

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीदेखील आक्रमक पवित्र घेत, गृह मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसला 'जशास तसे' उत्तर देण्याचा थेट इशारा दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 10:49 AM
Amit Shah, Mohan Joshi, Pune News, Congress

Amit Shah, Mohan Joshi, Pune News, Congress

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेटगनचा वापर
  • अमित शाहांचा पुणे दौरा उधळून लावण्याचा इशारा
  • कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचा भाजपचा आरोप
Amit Shah Pune Visit:  दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेटगनचा वापर या मुद्द्यांमुळे देशातील राजकीय वातवरण ढवळून निघाल आहे. एकीकडे संसदेत यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पु्ण्यातही राजकारण तापण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अन्यथा शहा यांच्या पुणे भेटीला विरोध करणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने येत्या १ ऑगस्टला अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोधा केला जाणार असल्याचे मोहन जोशी यांनी म्हटलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जंतरमंतरवरील जखमी विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांसमोर आणले.

Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप

दिल्ली पोलिस आणि आरएएफच्या जवानांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष मारहाणीमुळे देशभरातील पालकांमध्ये संतापाची भावना आहे. देशात शिक्षण पद्धत, स्पर्धा परीक्षा यात सुधारणा केल्या जाव्यात या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही जबाबदारी केंद्र सरकारची होती.त्याउलट दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी यासंदर्भात विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत, ते जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे जोशी यांनी म्हटले आहे.

मोहन जोशी यांच्या या इशाऱ्याने पुण्यात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने या दौऱ्यादरम्यान तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीदेखील आक्रमक पवित्र घेत, गृह मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा थेट इशारा दिला आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यावरून राजकीय संघर्ष

१ ऑगस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल  पुण्यात आयोजित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यासाठी येत आहेत. या महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Rahul Gandhi: ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाह जबाबदार; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना…’; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

“प्रशांत जगताप यांची चमकोगिरी” – घाटे यांचा घणाघात

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर निशाणा साधताना घाटे म्हणाले, “काँग्रेसचे शहराध्यक्ष पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर केवळ स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी आंदोलनाचे राजकारण करत आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने होणाऱ्या एका राष्ट्रीय कार्यक्रमात असा विघ्न आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या संस्कृतीला शोभणारा नाही. काँग्रेसने कायदा हातात घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम त्यांनाच भोगे लागतील.”

पोलिसांकडे आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी

याशिवाय कार्यक्रमात कोणताही गोंधळन नबहोता होऊ नये आणि सोहळा शांततेत पार पाडावा, यासाठी काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जर पोलिसांनी काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिली, तर भाजपलाही रस्त्यावर उतरून प्रतिआंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार राहील, असा इशारा घाटे यांनी दिला आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

Web Title: Congress threatens to protest amit shahs pune visit over student agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:49 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.