Congress vijay wadettiwar target shivsena uddhav thackeray on sudhakar badgujar political news
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामुळे एक प्रकारे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याचा मोठा फटका काश्मीरच्या पर्यटनाला बसणार आहे. या हल्ल्यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांना धर्म विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामधील सहा जण हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र आता याबाबत कॉंग्रेस पक्षाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. राज्यातील कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच पहलगाम हल्ल्यावरुन मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. पहलगाममध्ये जे काही घडलं, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खो-यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारलं. हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश नाही का? त्यावर या सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत. हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,” असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारला गोंधळी सरकार म्हटले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “महायुती सरकारची सगळी गोंधळलेली परिस्थिती आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कायदा सुव्यवस्थेवर आणि हिंदूत्वावर प्रश्न निर्माण करतात. परत स्थानिक नेते उत्तर देतात. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. तर उपमुख्यमंत्री म्हणतात 107 पाकिस्तानी सापडत नाहीये. सगळा समन्वयाचा अभाव आहे. सरकारमधील विसंवाद दिसून येत आहे,” असे स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.