DCM Ajit Pawar's efforts to rescue tourists trapped in Uttarkashi floods
मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील धराली येथे मंगळवारी (5 ऑगस्ट) झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या महापुरात रस्ते, घरे, दुकाने, सर्वकाही पाण्यात वाहून गेले आहे, नदीच्या पाण्यात अनेक वाहनेही वाहून गेली आहेत. उत्तराखंडमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातीन पर्यटकांचा आणि भाविकांचा देखील समावेश आहे. उत्तराखंडमधील या परिसथितीवर महाराष्ट्र राज्य सरकार देखील लक्ष ठेवून आहे.
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक, भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे. उत्तराखंडच्या प्रशासनाशी सुद्धा राज्य शासन सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रात लवकरात लवकर परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत,अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुप्रिया सुळेंनी जाहीर केली पुण्यातील पर्यटकांची यादी जाहीर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या टॅग करत या पर्यटकांचा शोध घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी यातील काही पर्यटकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही दिले आहेत.
अडकलेल्या काही व्यक्तींमध्ये हे समाविष्ट आहे:
1. अशोक किसन भोर – 9890600661
2. सविता शंकर काळे – 9527085169
3. अशोक टेमकर – 9867571585
4. लीला रोकडे – 9130346544
5. माणिक ढोरे – 9822364243
6. मारुती शिंदे – 9284153045
7. समृद्धी जंगम – 9936819132
8. सतीश मांगडे – 9766663401
9. लीना जंगम – 9769621996
10. पुरुषोत्तम – 9881403519
11. संगीता वालू – 8830146903
12. शिंदे गहिनीनाथ – 9881930966
13. अरुणा सातकर – 9860758977
14. विठ्ठल खेडकर – 9405851609
15. सुनीता ढोरे – 7499490903
16. नितीन जाधव – 9325666487
17. मंगल – 8805255991