
Deepak kesarkar Reaction on Rohit Arya Powai hostage case mumbai news update
Rohit Arya Powai case: मुंबई: पवईमध्ये काल (दि.30 ऑक्टोबर) धक्कादायक प्रकार घडला. रोहित आर्य नामक व्यक्तीने 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. आरए स्टुडिओमध्ये 19 जणांना डांबून ठेवण्यात आले. हे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाअंतर्गत ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ या प्रकल्पाचे तो संचालक होता. ‘शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्याने ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले’, असा दावा रोहित आर्यने केला होता. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांकडून चकमकीमध्ये एन्काऊंटर झाला. त्याला सरकारी कामामधून 2 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र ते थकवल्यामुळे रोहित आर्य याने आंदोलन आणि उपोषण देखील केले. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन देखील फायदा झाला नाही असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे. मात्र अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मी रोहित आर्य याला ओळखतो. मी रोहित आर्यला चेकने पैसे दिले होते. रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले. अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पवई ओलीस प्रकरणावर दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मृत रोहित आर्य याने यापूर्वी आंदोलन केल्यानंतर आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी माजी शालेय मंत्री दिपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. रोहीत आर्य हा नागपूरच्या शाळेत प्राध्यपक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यावेळीच्या शालेयमंत्री दिपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही. त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला होता. हा निधी न मिळाल्याने रोहित आर्याने आंदोलन केलं होतं. दीपक केसरकर यांच्या शासकीय बंगल्याबाहेर त्याने आंदोलन केलं होतं. एवढंच नाहीतर रोहित आर्यने आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं.