Jaykumar Gore News: कोपर्डे हवेली गावच्या विकासाचे दिवंगत हिंदुराव चव्हाण यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विकासामध्ये राहिलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी गावाला काहीही कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील हिंदुराव चव्हाण गटाच्या भाजप प्रवेश कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, कोपर्डे हवेली गावाने सिद्धेश्वर मंदिर पारा मागचा रस्ता, माणिक चौकात क्रीडा संकुल, नाना-नानी पार्क, भूमी अंतर्गत गटार योजना, संरक्षक भिंत, स्मशानभूमी सुशोभीकरण, बाळूमामा मंदिर सभा मंडप, वडेली निळेश्वर कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण, भवानी मंदिर मंडप या मागण्या केल्या आहेत. त्यासाठी हिंदुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणारा नेता असल्याने या मागण्या पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीन.
आ. अतुल भोसले यांनी या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील याची खात्री दिली. तसेच कराड पंचायत समिती इमारतीसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच 15 कोटी रुपये मंजूर केल्याचेही सांगितले. धैर्यशील कदम यांनी हिंदुराव चव्हाण यांनी मला बोट धरून कराड तालुक्यात आणले आहे. विकासकामांच्या माध्यमातून मी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
रामकृष्ण वेताळ यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे. या ठिकाणी सर्वांचा सन्मान केला जाईल आणि 17 गावांचा प्रलंबित विकास पूर्ण करण्यासाठी जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य मिळवले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी हिंदुराव चव्हाण यांच्या संपूर्ण गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी जि. प. सदस्या श्रीम. शशिकला चव्हाण, शैलेश चव्हाण, सुदाम चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, संदीप चव्हाण, दादासो चव्हाण, सागर चव्हाण यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
रेस्टॉरंट स्टाईल Honey Chili Potato आता घरीच बनवा; तुमच्या पार्टीची शान वाढवेल ही रेसिपी!
कराड उत्तर मतदारसंघांमध्ये भविष्यातील सर्व निवडणुकात यशस्वीता मिळवायची असेल तर, नेत्यांमधील एकीची भावना कायम टिकून राहावी. नेत्यांची एकी अखंडित राहिली तर, मोठमोठ्या संकटाचा सामना करणे सहज शक्य होईल. नेत्यांच्या एकीवरच भविष्यातील लढाई जिंकणे सहज शक्य होणार असल्याचे मत आ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
कराड उत्तर मतदारसंघांमध्ये हिंदुराव चव्हाण यांचा एक मोठा गट आहे. या गटाचे तुतारी बंद पाडण्यासाठी आम्हाला नेहमीच सहकार्य होते. आज त्यांचा सर्व गट भाजपच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत सामील झाला आहे. त्यामुळे खूप आनंद वाटत असल्याचे मत मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.